Video | इमारतीकडे पाहताच मुलाला आठवला मागचा जन्म, वडीलही दंग, कारण काय ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं कसं बदलेलं आहे. मुलांच्या मनात काय सुरु आहे, याची मार्मिक मांडणी या व्हिडीओमध्ये करण्यात आलीये. (child forgot his school corona lockdown)

Video | इमारतीकडे पाहताच मुलाला आठवला मागचा जन्म, वडीलही दंग, कारण काय ?
CORONA LOCKDOWN AND SCHOOL VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 5:00 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला विचार करायला लावतात. काही व्हिडीओ भीतीदायक तर काही आनंददायी असतात. यामध्ये सर्वाधिक चर्चा होते, ती मजेदार व्हिडीओंची. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं कसं बदलेलं आहे. मुलांच्या मनात काय सुरु आहे, याची मार्मिक मांडणी या व्हिडीओमध्ये करण्यात आलीये. (child forgot his school due to Corona and Lockdown video goes viral)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

हा व्हिडीओ मूळचा पंजाबी भाषेतील आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या वडिलांसोबत कुठेतरी जाताना दिसतोय. कारमध्ये बसल्यानंतर हा मुलगा अचानकपणे बाहेर पाहतोय. बाहेर पाहताना तो एका इमारतीकडे कुतूहलाच्या नजरेतून पाहतोय. मुलगा समोरच्या इमारतीकडे प्रश्नार्थक नजरेने का पाहत असावा अशी शंका त्याच्या वडिलांच्या मनात आली. पुढे हीच शंका त्यांनी आपल्या मुलाला विचारल्यानंतर छोट्या मुलाच्या उत्तराने चांगलीच धमाल उडाली आहे. दिलेल्या उत्तरामुळे व्हिडीओमधील मुलाला आपल्या वडिलांचा मार खावा लागला आहे.

मुलगा इमारतीकडे का पाहत होता ?

आपला मुलगा समोरच्या इमारतीकडे एकसारखा का पाहत आहे, असा प्रश्न मनात आल्यानंतर व्हिडीओमधील माणसाने त्यांच्या मुलाला प्रश्न विचारला. तू त्या इमारतीकडे एकसारखं का पाहत आहेस ? असं विचारल्यानंतर त्या मुलाने हैराण करणारं उत्तर दिलं. पपा मला वाटतं, की या इमारतीसोबत माझं जुणं काहीतरी नातं असावं, त्या इमारतीशी माझा मागील जन्माचा काहीतरी संबंध असावा, असे व्हिडीओतील मुलगा आपल्या वडिलांना सांगताना दिसतोय.

मात्र, आपल्या मुलाच्या या उत्तरामुळे व्हिडीओतील माणूस चांगलाच खवळला आहे. मुलाच्या वडिलाने त्याच्या कानशिलात लागावली आहे. कारण मुलगा पाहत असलेली इमारत ही दुसरी काहीही नसून त्याची शाळा आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्याच्या कोरोना परिस्थीमुळे सर्व शाळा बंद आहेत. सध्या सर्व विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतायत. मागील वर्षापासून शाळेचे तोंडही न पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा विस्मरणात गेल्यासारखे झाले आहे. हाच मुद्दा घेऊन हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा सगळा स्क्रिप्टेड व्हिडीओ असला तरी, लोकांना तो चांगलाच आवडतोय. लोक या व्हिडीओला आपल्या ट्विटर अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड केला आहे. यावेळी त्यांनी अगदीच मजेदार कॅप्शन दिलं आहे. “कोरोनाला लवकरच हारवणे गरजेचे आहे. कारण सध्या प्रकरण गंभीर होत चालले आहे,” असे काबरा यांना मजेदार शैलीत म्हटले आहे.

दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | चालत्या ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं गाणं, गोड आवाजाचे नेटकरी दिवाणे, व्हिडीओ पाहाच

Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

Video | रस्त्यावर चालतानाही मोबाईलमध्ये डोकं, नंतर पठ्ठ्यासोबत ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरल

(child forgot his school due to Corona and Lockdown video goes viral)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.