AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

सध्या एका महिला अँकरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बातम्या देत असताना या महिला अँकरच्या अचानकपणे क्लोन इमेजेस दिसायला सुरुवात झाली. (fox 9 news anchor jennifer mcdermed)

Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स
FOX 9 NEWS VIRAL VIDEO
| Updated on: May 16, 2021 | 11:02 PM
Share

मुंबई : नागरिकांची प्रत्येक अडचण तसेच सामान्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. कोणताही विश्रांती न घेता त्यांचे हे काम अविरतपणे सुरु असते. तुम्ही टीव्ही पाहता ते अँकर्ससुद्धा मोठी मेहनत घेतात. प्रत्येक बातमी सोप्या आणि सहज भाषेत सांगण्याचे काम हे अँकर्स करतात. मात्र, सध्या एका महिला अँकरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बातम्या देत असताना या महिला अँकरच्या अचानकपणे क्लोन इमेज दिसायला सुरुवात झाली. याच प्रकारमामुळे नंतर मोठीच गंमत घडली. हा सर्व प्रकार नेटकऱ्यांना आवडला असून हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. (fox 9 news anchor Jennifer Mcdermed clone image funny video goes viral)

नेमकं काय झालं ?

ही घटना आंतरराष्ट्रीय माध्यम फॉक्स 9 न्यूजच्या स्टुडीओमध्ये घडली. फॉक्स 9 न्यूजच्या महिला अँकर जेनिफर मॅकडरमेड (Jennifer Mcdermed) या बातम्या देत होत्या. त्या कोणत्या ठिकाणी हवामानाची स्थिती काय आहे ? याची माहिती सांगत होत्या. मात्र, याच वेळी अचानकपणे काहीतरी तांत्रिक बिघाड झाली. याच तांत्रिक अडचणीमुळे जेनिफर मॅकडरमेड यांच्या क्लोन इमेजेस दिसायला सुरुवात झाली. या सर्व क्लोन इमेजेस जेनिफर मॅकडरमेड यांच्यासोबतच हवानाबद्दल माहिती द्यायला लागल्या. तसेच जेनिफर मॅकडरमेड जसे हावभाव करतील, अगदी तसेच हावभाव या क्लोन इमेज करायला लागल्या.

महिला अँकरकडून वेगवेगळे हावभाव

ही घटना घडत असताना काहीतरी बिघाड झाली आहे, हे जेनिफर मॅकडरमेड यांच्यासुद्धा लक्षात आलं. स्क्रीनवर दिसत असलेल्या क्लोन इमेज पाहून जेनिफर मॅकडरमेड यांना हसू आवरलं नाही. त्या स्क्रीनसमोरच मोठ्याने हसायला लागल्या. तसेच वेगवेगळे हावभावसुद्धा करायला लागल्या. वेगवेगळे हावभाव केल्यानंतर जेनिफर मॅकडरमेड यांच्या निर्माण झालेल्या क्लोनिंग इमेजेस पाहण्यासारख्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

दरम्यान, तांत्रिक त्रुटी दूर झाल्यानंतर जेनिफर मॅकडरमेड यांनी पुन्हा एकदा हवामानाची माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, हा जो काही प्रकार घडला, तो सगळा जसाच्या तसा फॉक्स 9 ने आपल्या यूट्यूबवर अपलोड केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यानंतरसुद्धा कुठलाही गोंधळ न करता जेनिफर यांनी चांगल्या पद्धतीने हे सगळं सांभाळलं, असं एकाने म्हटलंय. तर एकाने झालेल्या तांत्रिक बिघाडाला जेनिफर यांनी मजेशीरपणे हाताळलं नसतं तर हा एक सामान्य व्हिडीओ म्हणून लोकांनी पाहिला असता, असंसुद्धा एकाने म्हटलंय. अनेक नेटकऱ्यांनी जेनिफर यांच्या हजरजबाबीपणाची प्रशंसा केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाख 11 हजार 675 वेळा पाहिलं गेलंय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याची चांगलीच चर्चा होत आहे. अनेकांनी या व्डिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Viral Video | मांजरीच्या कुरापतीने नेटकरी दंग, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | रस्त्यावर चालतानाही मोबाईलमध्ये डोकं, नंतर पठ्ठ्यासोबत ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरल

Video | तरुण सकाळी मासे पकडायला गेला, अचानक समोर आली मगर, नंतर जे घडलं ते पाहाच…

(fox 9 news anchor Jennifer Mcdermed clone image funny video goes viral)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.