Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं…
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाबाबत चीनने एक विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केल्यानंतर चीनचे हे विधान आले आहे. चीनने पाकिस्तानमध्ये भारताच्या लष्करी कारवाईवर नापसंती व्यक्त केली आहे आणि ती खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
पहलागम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. यावेळी पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात पुढे करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला धडकी भरलेली असताना आता चीनची भाषा देखील बदलली असल्याचे पाहायला मिळतंय. भारताकडून पाकिस्तानवर कऱण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तान शांत बसायला तयार नाही. पाकिस्तानकडून पुन्हा बदला घेण्याची भाषा करण्यात येत आहे. अशातच पाकिस्तानने जरा संयमाने घ्यावं, असा सल्लाच चीनने पाकिस्तानला दिलाय. यासह युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काही पाकिस्तानने करू नये, असंही चीनकडून पाकिस्तानला सांगण्यात आलंय.
चीनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, भारत आणि पाकिस्तान नेहमीच एकमेकांचे शेजारी आहेत आणि राहतील. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. चीनने भारत आणि पाकिस्तान दोघांनाही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती बिघडू शकेल अशी पावले उचलणे टाळावे, असे चीनने म्हटले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

