CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
CM Fadnavis Video Call To Injured Police Officers : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर घटनेत जखमी झालेल्या पोलिसांशी व्हिडिओ कॉलकरून संवाद साधला व प्रकृतीची विचारपूस केली.
नागपूर राडा प्रकरणातील जखमी झालेल्या पोलिसांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपर्क साधला आहे. व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी या सर्व जखमी पोलिसांशी बातचीत करत, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. नागपूर येथील कालच्या घटनेत पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेला आहे.
Published on: Mar 18, 2025 03:37 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

