‘कफनचोर, खिचडीचोर अन्…’, मुख्यमंत्र्यांनी कोरोना महामारीतील ठाकरेंच्या घोटाळ्यांची केली थेट पोलखोल

‘कफनचोर, खिचडीचोर अन्…’, मुख्यमंत्र्यांनी कोरोना महामारीतील ठाकरेंच्या घोटाळ्यांची केली थेट पोलखोल

Harshada Shinkar | Updated on: Dec 20, 2023 | 6:13 PM

सरकारवर सातत्याने आरोप टीका करणाऱ्या विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सडेतोड उत्तरं दिली. सभागृहात एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत ठाकरे सरकारच्या काळातील घोटाळ्यांची मालिकांच उघड केली.

नागपूर, २० डिसेंबर २०२३ : हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस असल्याने विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. सरकारवर सातत्याने आरोप टीका करणाऱ्या विरोधकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सडेतोड उत्तरं दिली. सभागृहात एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत ठाकरे सरकारच्या काळातील घोटाळ्यांची मालिकांच उघड केली. कोरोना महामारीच्या वेळी केलेल्या बॉडीबॅगपासून अनेक मुद्द्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. एका मागे एक घोटाळ्यांचे पुरावे उघड करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीयांना दिला. ‘कोविड काळात सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर आपल्या स्वकीयांच्या घरी, बाकी जनता फिरते दारोदारी अशी अवस्था होती’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर टोलेबाजी केली.

Published on: Dec 20, 2023 6:13 PM
Follow Us