AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मविआ’च्या काळातील सुरस कथा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ‘पोलखोल’

CM Eknath Shinde | उद्धव ठाकरे गटाची राज्य सरकारवर रोज तोफ धडाडते. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. महाविकास आघाडीच्या काळातील अनेक घोटाळ्यांची मालिकाच त्यांनी समोर आणली. कोरोना काळात तिजोरीवर दरोडा घातल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. त्यांनी एका पाठोपाठ एक गौप्यस्फोट केले. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली.

'मविआ'च्या काळातील सुरस कथा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली 'पोलखोल'
cm eknath shinde Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 20, 2023 | 9:16 PM
Share

नागपूर | 20 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज चौफेर फटकेबाजी केली. यापूर्वी राज्याच्या सत्ताकेंद्रात असलेल्या महाविकास आघाडीच्या काळातील अनेक घोटाळ्यांची मालिकाच त्यांनी बाहेर काढली. एका मागून एक बॉम्ब त्यांनी टाकले. मुख्यमंत्र्यांनी मोठा दारुगोळा सोबत आणला. त्यांचा तोफखाना आज धडाडताना दिसला. त्यांनी महाविकास आघाडीतील अनेक निर्णयांना पट्यावर घेतले. एका पाठोपाठ एक बॉ़म्बगोळे त्यांनी डागले. कोरोना काळातील घाटाळ्यांची मालिकाच त्यांनी समोर आणली. काय केले मुख्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट?

घोटाळे पुराव्यानिशी समोर आणणार

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला आज धारेवर धरले. महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांविरोधात मोठा दारुगोळा असल्याचा इशारा त्यांनी दिला. तपासामध्ये सगळं बाहेर येईल. विथ प्रुफ सर्व बाहेर येणार असा इशारा त्यांनी दिला. त्यांचा रोख अर्थात उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होता. त्यांनी युवराज म्हणून आदित्य ठाकरे यांना पण चिमटे काढले.

  1. ऑक्सिजन प्लँट – ऑक्सिजन प्लँटची सुरुवात झाली कपड्याचे दुकानतून, रोमिन छेडा नावाच्या व्यावसायिकेचा गंजलेला ऑक्सिजन प्लँट दिल्याने फंगसचा प्रादुर्भाव झाला. त्यात काही लोकांचा जीव गेला. काहींच्या डोळ्यांना त्रास झाला. हे सर्व रेकॉर्डवर असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वीच्या सरकारचा केवळ पैशाशी मतलब होता असे ते म्हणाले.
  2. टेंडर तिथे सरेंडर – यापूर्वीचे सरकार टेंडर तिथे सरेंडर असे असल्याचा टोला त्यांनी लगावला. कोविड काळात सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर आपल्या स्वकीयांच्या घरी, बाकी जनता फिरते दारोदारी अशी अवस्था होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर केली.
  3. आरोग्य व्यवस्थेला आणले रस्त्यावर – रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लँट उभारण्याचे काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेल्या हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. कुणाच्या खात्यात किती रक्कम जमा झाली. धनादेशाने व्यवहार झाले. त्याची संपूर्ण माहिती देण्यात येईल असे ते म्हणाले.
  4. लाईफलाईनचा काढला पंचनामा – लाईफलाईन हॉस्पिटलमधील घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला. लाईफलाईन नाही तर ही डेथलाईन असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल ने तर लुटा लुटीचा उच्चांक गाठलेला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेत काल्पनिक रुग्णं दाखवले, काल्पनिक डॉक्टर दाखवले. त्यांचा पगार काढला. रुग्णांना औषधं वितरण केल्याचे दाखवले. त्यातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या दौलतीतून कोणाची घरं भरण्यात आली. कोणाच्या तुमड्या भरल्या हे समोर येईल, असा इशारा त्यांनी दिला.
  5. खिचडी घोटाळा पण समोर – कोविड काळात कामगार आणि गोरगरीब वर्गाला मोफत खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात आले होते. 33 रुपयांत 300 ग्रॅम खिचडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळ कंत्राटदाराने मापात पाप केले. त्यांनी दुसऱ्या कंपनीला 100 ग्रॅम खिचडीचे कंत्राट दिले. गोरगरिबांचा घास हिरावला. 300 ग्रॅम खिचडीऐवजी 100 ग्रॅम खिचडीचे वाटप करण्यात आले. या कंत्राटदाराचे किचन गोरेगाव येथील एका हॉटेलचा पत्ता दाखविण्यात आला. हे त्या हॉटेल मालकाला पण माहिती नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...