खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर…खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!

खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर…खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!

| Updated on: Jul 05, 2026 | 4:09 PM

सध्या राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी दावा केला होता की, काँग्रेस नेते धीरज लिंगाडे यांना शिंदे सेनेकडून तब्बल 20 कोटी रुपयांची ऑफर आणि मोठ्या पदाचे आमिष देण्यात आले

सध्या राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी दावा केला होता की, काँग्रेस नेते धीरज लिंगाडे यांना शिंदे सेनेकडून तब्बल 20 कोटी रुपयांची ऑफर आणि मोठ्या पदाचे आमिष देण्यात आले आहे. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, या दाव्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत संजय राऊत यांचे वक्तव्य पूर्णपणे खोटे आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले. “मला शिंदे सेनेकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. मी पैशासाठी कुठेही जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिले असून त्यांच्या कामात मी समाधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले. “एका ठिकाणी निवडून यायचे आणि दुसऱ्या पक्षात जायचे हे चुकीचे आहे,” असे म्हणत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. तसेच माझे नाव का घेतले याबाबत मी संजय राऊत यांना विचारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 05, 2026 4:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us