कुत्र्याने चाटलेलं तूप अन् सीतेची तुलना? रामाने युद्ध का केलं? वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ, IAS अधिकारी चर्चेत!

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Nov 11, 2022 | 4:03 PM

ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दृष्टी IAS (Drishti IAS) हे कोचिंग सेंटर बंद पाडण्याची मागणी केली जात आहे. ट्विटरवर  #BanDrishtiIAS हा ट्रेंड चर्चेत आहे. 

कुत्र्याने चाटलेलं तूप अन् सीतेची तुलना? रामाने युद्ध का केलं? वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ, IAS अधिकारी चर्चेत!
Image Credit source: social media

मुंबईः प्रभू राम (Ram) आणि सीतेवर (Sita) अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केल्याने UPSC कोचिंग सेंटरचे एक शिक्षक प्रचंड चर्चेत आले आहेत. डॉ. विकास दिव्यकीर्ती (Dr. Vikas Divyakirti) असं त्यांचं नाव आहे. UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं तर त्यांना हे नाव चांगंलच परिचित आहे. डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफ्फान व्हायरल होतोय. त्यावरून त्यांचा दृष्टी IAS (Drishti IAS) हे कोचिंग सेंटर बंद पाडण्याची मागणी केली जात आहे. ट्विटरवर  #BanDrishtiIAS हा ट्रेंड चर्चेत आहे.

सुरुवातीला डॉ. विकास दिव्यकीर्ती यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात ते म्हणतात, मी एक लेख वाचला. पुरुषोत्तम अग्रवाल यांचा. वाल्मिकी रामायण किंवा त्यासंबंधी रचनेचा आहे. रामाने रावणासोबतचं युद्ध जिंकलं. फिल्ममध्ये नायक-नायिका कसे धावत येतात. तसं दृश्य. एवढ्या दिवसांनी भेटतायत. कठीण प्रसंगानंतर. मजाक थोडी आहे?

सीता प्रफुल्लित असते… माझ्या रामाने रावणाला नष्ट केलंय. आता मी माझ्या घरी जाणार… राम पाहतो. त्याला वाटते ही जरा जास्तच खुश होतेय. राम म्हणतो, थांब सीते… सीतेला वाटलं असेल पूजा वगैरे करायची असेल…

रामाने जे वाक्य म्हटलं, ते खूप वाईट आहे. बोलताना माझी जीभ गळून पडेल. पण बोलावं लागेल. काय करणार? (डॉ. विकास दिव्यकीर्ती हसतात.. वर्गात हशा पिकतो…) ते वाक्य असं… हे सीते, हे युद्ध मी तुझ्यासाठी लढलंय, असं तुला वाटत असेल तर हा तुझा गैरसमज आहे.

हे युद्ध माझ्या कुळाच्या सन्मानासाठी लढलंय. तुझ्याबद्दल बोलायचं तर कुत्र्याने चाटलेलं तूप खाण्यायोग्य राहत नाही, तशी तू माझ्यासाठी योग्य नाही… संस्कृतच्या एका ग्रंथात रामाच्या तोंडी एका लेखकाने हे वाक्य घेतलंय. लेखक लोक आपल्या मनाच्या गोष्टी पात्राच्या तोंडी टाकतात. त्यामुळे पात्राची प्रतिमा बिघडते… लेखकाने लिहिलेल्या वक्तव्यांवर डॉ. विकास दिव्यकीर्ती बोलत होते. मात्र त्यांच्या या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर तुफ्फान व्हायरल होतेय. दर काही मिनिटांनी असंख्य ट्विट येत आहेत. काही ट्रोलर्सच्या मते, डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी राम आणि सीतेवर अत्यंत घृणास्पद वक्तव्य केलंय. यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.

डॉ. विकास दिव्यकीर्ती यांच्या विरोधातील ट्विट असे-

साध्वी प्राची यांनी ट्विट केलंय. त्यानंतर तर प्रतिक्रियांचा पूरच आलाय. हे तथाकथित सेक्युलर लोक हिंदु धर्माचा अपमान करण्याचं दुःसाहस कसे करू शकतात, असा सवाल विचारला जातोय.

डॉ. विकास दिव्यकीर्ती यांच्या समर्थनार्थदेखील एक सोशल मीडियातील ग्रुप अॅक्टिव्ह झाला आहे. डॉ. विकास दिव्यकीर्ती, नेमक्या कोणत्या संदर्भाने हे बोलत होते, याचा संपूर्ण हवाला त्यांच्या ट्विट्समध्ये देण्यात येतोय.

डॉ. विकास दिव्यकीर्ती यांच्या समर्थनार्थ व्हायरल होणारे ट्विट असे-

तसेच UPSC कोचिंग क्लासेसमध्ये प्रसिद्धी मिळाल्यामुळेच डॉ. विकास यांच्याविरोधात ही मोहीम उघडली गेल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI