Chandrashekhar Bawankule | सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ; मंत्री बावनकुळे यांनी दिले स्पष्टीकरण
सरकारी पत्रात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया’ म्हणून झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या पत्राची माहिती दिली आणि ते पत्र माध्यमांसमोर आणले. पत्र 20 जून 2025 रोजी महसूल खात्याने पाठवले असून, त्यात नमूद आहे की, “भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या स्टँप ड्युटी व दंडाची रक्कम शासनाच्या थकित महसूल म्हणून वसूल करण्यासाठी सात दिवसांत चौकशी करून माहिती द्यावी.”
सरकारी पत्रात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया’ म्हणून झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या पत्राची माहिती दिली आणि ते पत्र माध्यमांसमोर आणले. पत्र 20 जून 2025 रोजी महसूल खात्याने पाठवले असून, त्यात नमूद आहे की, “भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या स्टँप ड्युटी व दंडाची रक्कम शासनाच्या थकित महसूल म्हणून वसूल करण्यासाठी सात दिवसांत चौकशी करून माहिती द्यावी.” नाना पटोले यांच्या आरोपानुसार, या पत्रावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे. मंत्री म्हणून काम करताना जो विषय तक्रारदाराकडून येतो त्या विषयाला धरून आपण लिहितो, यात आमदार कुठेही लिहिलेले नाही. नरेंद्र मेहता यांचं नाव लिहिलेलं आहे. नाना पटोले हे राजकारण करत आहेत. यात तक्रार खाली पाठवलेली आहे. नाना पटोले यांच्यावर फार बोलणार नाही. निवेदन आलं की मंत्री म्हणून काम करावं लागतं. आमदार म्हणून नाव नाही, विषय जसा आहे त्या निवेदनाद्वारे ते लिहिलेलं आहे. येत्या 7 दिवसांत या विषयीच्या निवेदनांची चौकशी करून कारवाई होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तक्रारीवर चौकशी मागितली आहे ती होईल. मेहता यांच्याबद्दल 15 पत्र आले आहेत. यापूर्वी 10 ते 12 तक्रारींमध्ये त्यांचा दोष सिद्ध झालेला नाही. मात्र आलेल्या तक्रारीची दखलही मंत्री म्हणून घेतली जाते. नाना पटेलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथे देणे गरजेचे नाही. नानांनी सभागृहात बोलावे. नाना यांनी बोलावं की कांग्रेसची ओडिसात काय अवस्था झाली आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
