Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष

Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष

| Updated on: Jul 13, 2026 | 2:22 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या खाजगी दौऱ्यानिमित्त गोव्यात आहेत. रविवारी सकाळी त्यांनी दक्षिण गोव्यातील एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉकचा आनंद घेतला. यावेळी त्यांची गोव्यात "पेले" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक मच्छिमाराशी अनौपचारिक भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या खाजगी दौऱ्यानिमित्त गोव्यात आहेत. रविवारी सकाळी त्यांनी दक्षिण गोव्यातील एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉकचा आनंद घेतला. यावेळी त्यांची गोव्यात “पेले” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक मच्छिमाराशी अनौपचारिक भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या.

संवादादरम्यान गोव्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक मच्छिमारांचे प्रश्न आणि राज्यातील विकासाच्या संधी यावर चर्चा झाली. मच्छिमार पेले यांनी गोव्याच्या पर्यटनाला अधिक चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील पर्यटकांना गोव्याला भेट देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची विनंती केली.

“मुंबई आणि महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी गोव्यात येतात. गोव्याच्या पर्यटनाचा अधिक प्रचार झाल्यास स्थानिक व्यवसायांना मोठा फायदा होईल,” असे पेले यांनी सांगितले. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावरील ही साधी आणि मैत्रीपूर्ण भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

Published on: Jul 13, 2026 2:19 PM
Follow Us