मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅब तयार करणार – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत. यात महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅबची निर्मिती, मुंबईतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी २००० अतिरिक्त खाटांची व्यवस्था, रोजगार निर्मितीसाठी जीसीसी वेवचा उपयोग, आणि गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाला मिळालेली मंजुरी हे प्रमुख मुद्दे आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण आणि कौशल्य-आधारित शिक्षण देण्यावर भर दिला जाईल. विशेषतः, प्रत्येक महानगरपालिका शाळेत मराठी भाषा प्रभावीपणे शिकवण्यासाठी मराठी लँग्वेज लॅब तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि शिकवण्याच्या पद्धतींचा वापर केला जाईल.
आरोग्य क्षेत्रात, मुंबईतील सध्याच्या सुविधा सुधारून अधिक चांगल्या सोयी उपलब्ध केल्या जातील. कोविडसारख्या साथीच्या रोगांच्या अनुभवातून शिकत, मुंबईच्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेल्या २००० अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्याचा मानस आहे. रोजगार निर्मितीसाठी, मुंबई आणि एमएमआरमध्ये एक व्हायब्रंट इकोसिस्टम विकसित करून जीसीसी वेवचा फायदा घेतला जाईल, ज्यामुळे तरुणांसाठी उच्च वेतनाची रोजगार संधी निर्माण होतील. तसेच, मुंबईच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर गारगाई प्रकल्पाद्वारे तोडगा काढण्यात येणार असून, या प्रकल्पाला आता पर्यावरण मंजुरी मिळाली आहे आणि निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
पक्ष म्हणून नाही परिवार म्हणून एकत्र आलोय! अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य
नाशिक सभेत ठाकरे बंधुंच्या टीकेवर फडणवीस करणार जोरदार प्रहार?
तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरलाच जावं लागेल; धंगेकर बरसले
मराठी भाषेसाठी लँग्वेज लॅब तयार करणार - देवेंद्र फडणवीस

