Devendra Fadnavis | सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर घणाघात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या कार्याचे जाहीरपणे कौतुक केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करताना फडणवीस यांनी दरेकर हे मासिकाचे संपादक म्हणूनही उल्लेखनीय काम करत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रवीण दरेकर यांनी सहकारी संघाच्या माध्यमातून प्रभावी काम केले असून, त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हायला हवा. “मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांनाही पुरस्कार दिला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी दरेकरांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. “सकाळी ९ वाजता भोंगा न वाजवता देखील उत्तम संपादक म्हणून काम करता येते, हे दिसून येत आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. दरम्यान, फडणवीस यांच्या या अप्रत्यक्ष टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.