CCTV Video : सामान द्यायला आला, लघुशंका करून गेला, डिलिव्हरी बॉयचा घृणास्पद प्रकार सीसीटीव्हीत कैद, रहिवाशांच्या लक्षात येताच…

CCTV Video : सामान द्यायला आला, लघुशंका करून गेला, डिलिव्हरी बॉयचा घृणास्पद प्रकार सीसीटीव्हीत कैद, रहिवाशांच्या लक्षात येताच…

| Updated on: Jul 21, 2025 | 6:36 PM

झटपट सेवा देण्याची मागणी झपाट्याने वाढत्या वाढल्याने डिलिव्हरी बॉईज सर्रास सगळीकडेच पाहायला मिळत आहे. कोणत्याही वेळी कधीही ग्राहकांना सेवा देण्याची सुविधा या डिलिव्हरी कंपनीने सुरू केल्यानं कोणत्याही सोसायटीमध्ये कोणत्याही वेळी ग्राहकांचे पार्सल देणाऱ्या या व्यक्ती पाहायला मिळताय.

विरार पश्चिमेला असणाऱ्या एका सोसायटीतील घृणास्पद प्रकार समोर आला आहे. विरारमध्ये चक्क डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्येच लघुशंका केल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विरार पश्चिमेला असणाऱ्या सिडी गुरुदेव बिल्डिंगमधील लिफ्टमध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे ऑनलाईन पार्सल द्यायला आलेल्या तरुणाने हे कृत्य केल्याचे पाहायला मिळाले. सिडी गुरुदेव बिल्डिंगच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व घृणास्पद प्रकार कैद झाला आहे. ही बाब सिडी गुरुदेव बिल्डिंगमधील रहिवाशांच्या लक्षात येताच या घटनेचा CCTV तपासून ज्या कंपनीतून डिलिव्हरी देण्यासाठी तरूण आला होता त्यांच्या ऑफीमध्ये जाऊन त्याची तरुणाची चौकशी करून त्याला बेदम चोप दिल्याचे समोर आले आहे.

Published on: Jul 21, 2025 06:36 PM