नाना पटोले नेमके कुणाचे? आंबेडकरांच्या शंकेवर पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, योग्य वेळी …
वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर.... नाना पटोले नेमके कुणाचे? काँग्रेसचे की गडकरींचे? असा सवाल वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपची बी पार्टी कोण हे योग्य वेळ आल्यावर सांगेल, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.
नाना पटोले नेमके कुणाचे? काँग्रेसचे की गडकरींचे? असा सवाल वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपची बी पार्टी कोण हे योग्य वेळ आल्यावर सांगेल, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. ‘वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर काँग्रेस भाजपमधील नेते हरले असते आणि ते नाना पटोले यांना नको होतं. म्हणून वंचितला बाहेर ठेवलं गेलं. आता फक्त नाना पटोले यांनी सांगावं की, मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणांसोबत झाली की नाही?’, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला. तर यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, ‘त्यांना जितकं बोलायचं आहे ते बोलू दे…भाजपची बी पार्टी कोण हे योग्य वेळी सांगेन. मॅच फिक्सर कोण आहे हे कळतंय. कोणी कधी कुठे फिक्सिंग केली. हे मी नक्की सांगेल’
Published on: Apr 01, 2024 6:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
