Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी

| Updated on: Jul 11, 2026 | 1:20 PM

आषाढी वारीचे वेध लागलेल्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवेघाटात वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तीभाव पाहायला मिळत आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काही वेळात दिवेघाटाची चढाई पूर्ण करून घाटाच्या वरच्या टप्प्यात पोहोचणार आहे. त्याआधी सकाळपासूनच पालखीसोबत असलेल्या अनेक दिंड्या दिवेघाट परिसरात दाखल झाल्या आहेत.

लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे आणि टाळ मृदंगाच्या नादात संपूर्ण दिवेघाट परिसर भक्तीत न्हाऊन गेला आहे. दिवेघाटाचा मार्ग हा वारीतील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक मानला जातो. मात्र, विठ्ठलनामाचा गजर करत वारकरी हा टप्पा मोठ्या उत्साहाने पार करत आहेत.

Published on: Jul 11, 2026 1:19 PM
Follow Us