Anil Deshmukh | ईडीकडून मुंबईत ज्ञानेश्वरी बंगल्यावर छापेमारी

| Updated on: Jun 25, 2021 | 12:29 PM

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीकडून मुंबईतील त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर छापेमारी केली आहे.

Follow us on

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. ईडीकडून मुंबईतील त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर छापेमारी केली आहे.