शिंदेंकडून दोन विमानांची व्यावस्था; दुबईतून 164 प्रवासी मुंबईत परतले
आखाती प्रदेशातील तणावामुळे दुबईत अडकलेल्या 164 भारतीय प्रवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांमुळे मुंबईत परतता आले. विमानांची व्यवस्था केल्याबद्दल प्रवाशांनी शिंदेंचे आभार मानले. दुबईत वाढलेले हॉटेल खर्च, विमानांचे आवाज आणि घरी परतण्याच्या चिंतेमुळे प्रवाशांनी भीतीचा अनुभव घेतला होता.
आखाती प्रदेशात सुरू असलेल्या तणावामुळे दुबईत अडकलेल्या 164 भारतीय प्रवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुखरूप मुंबईत परत आणण्यात आले. दुबईमध्ये अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे हे प्रवासी तिथे अडकले होते. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये त्यांना भीतीदायक परिस्थितीचा सामना करावा लागला. बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचे आवाज ऐकू येत होते, तसेच विमानतळ बंद झाल्याने आणि हॉटेल्सचे दर वाढल्याने त्यांच्या परतीच्या प्रवासात अनिश्चितता निर्माण झाली होती. ठाण्यातील काही रहिवाशांनी सांगितले की, मुन्नाभाई नावाच्या व्यक्तीने त्यांची अडचण एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर शिंदे यांच्या कार्यालयाने तात्काळ दखल घेऊन त्याच रात्री एमरेट्सचे तिकीट पाठवून प्रवाशांना दोन दिवसांत भारतात परतण्याची व्यवस्था केली. प्रवाशांनी आपल्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर मोठा आनंद व्यक्त केला, कारण त्यांना वाटले होते की परतीसाठी 40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
