जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी… सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं

जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी… सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं

| Updated on: Aug 04, 2026 | 5:28 PM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री असून, त्यांचा अपमान करणे योग्य नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेसवाल्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, “काँग्रेसने जनाची नाही तर मनाची लाज ठेवली पाहीजे….हा फक्त सुनेत्रा पवारांचा अपमान नाहीए. हा राज्यातील महिलांचा अपमान आहे.”

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांवरही शिंदे यांनी निशाणा साधला. “काँग्रेसचे राष्ट्रीय नेते परदेशात जाऊन देशाचा, मोदींजीचा अपमान करतायेत तर इथले नेते महिला नेत्यांचा अपमान करतायेत,” असे ते म्हणाले.

दरम्यान, ज्येष्ठ नेते डी वाय पाटील यांच्याबाबतही शिंदे यांनी भाष्य केले. “डी वाय पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम केले. त्यांनी बिहार, त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम केले. त्यांचे योगदान मोठे राहीले आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

Published on: Aug 04, 2026 5:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us