LPG Crisis | पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत, ऑर्डर्स रद्द
पिंपरी-चिंचवड शहरात गॅस टंचाईचा परिणाम आता केटरिंग व्यवसायावरही दिसून येत आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक केटरिंग व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. केटरर्सच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांच्याकडे फक्त दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गॅस टंचाईचा परिणाम आता केटरिंग व्यवसायावरही दिसून येत आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक केटरिंग व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. केटरर्सच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांच्याकडे फक्त दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे या महिन्यातील नवीन घरांच्या पूजा, लहान-मोठे समारंभ आणि इतर स्वयंपाकाच्या ऑर्डर्स रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गॅसची उपलब्धता कमी असल्यामुळे आधीच घेतलेल्या प्री-बुकिंग ऑर्डर्स देखील रद्द कराव्या लागत असल्याचे केटरिंग व्यावसायिकांनी सांगितले. या परिस्थितीमुळे केटरिंग व्यवसायावर आर्थिक परिणाम होत असून, लवकरच गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 13, 2026 06:19 PM
Follow Us
