मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांच्यासह तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असून, पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. या संभाव्य घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, संदीप भाटिया आणि तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली, तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या संभाव्य पक्षांतरामुळे गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो, तर भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, संबंधित नेते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.