Himanta Biswa Sarma Oath Ceremony | हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, मोदी-शाहांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
आसाममध्ये नव्या सरकारचा आज भव्य शपथविधी सोहळा पार पडणार असून, हिमंत बिस्वा सरमा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटीतील खानापारा परिसरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष आसामकडे लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमासाठी गुवाहाटीत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे काल रात्रीच गुवाहाटीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील आसाम दौऱ्यावर असून, त्यांच्यासोबत पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे नेतेही उपस्थित आहेत. बंगालनंतर आता आसाममधील शपथविधी सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागले असून, या कार्यक्रमाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
Published on: May 12, 2026 09:58 AM
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर