Holi Festival : बंजारा समाजासोबत आमदार श्वेता महालेंची धुळवड, पारंपरिक गीतांवर केले नृत्य

Holi Festival : बंजारा समाजासोबत आमदार श्वेता महालेंची धुळवड, पारंपरिक गीतांवर केले नृत्य

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 12:55 PM

बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील हरणी येथे बंजारा समाज मोठ्या संख्येने राहत असून धुलीवंदन हा त्यांचा प्रमुख सण आहे. हा सण ते मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. याठिकाणी चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी हरणी येथे बंजारा समाजबांधवांसोबत होळीचा सण साजरा केलाय.

बुलडाणा – राज्यभरात काल होळी- धुलीवंदनाचा उत्साह होता. विविध समाजातील होळीही (Holi Festival) विविध पद्धतीने साजरी करण्यात आली. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील हरणी येथे बंजारा (banjara) समाज मोठ्या संख्येने राहत असून धुलीवंदन हा त्यांचा प्रमुख सण आहे. हा सण ते मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. याठिकाणी चिखलीच्या आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale)यांनी हरणी येथे बंजारा समाजबांधवांसोबत होळीचा सण साजरा केलाय. यावेळी त्यांनी तेथील महिलांसोबत त्यांच्या पारंपरिक गीतावर नृत्यही केलं.

Published on: Mar 19, 2022 12:54 PM