Maharashtra Weather Weather : राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यांना IMD चा अलर्ट? तुमच्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस?

Maharashtra Weather Weather : राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यांना IMD चा अलर्ट? तुमच्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस?

Harshada Shinkar | Updated on: Jul 11, 2024 | 1:14 PM

Maharashtra rain forecast update imd monsoon राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढले असून नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली होती. राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. तर शेत-शिवार आणि घरं पाण्याखाली

राज्यातील दहाहून अधिक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर यासबोतच मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढले असून नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली होती. राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले होते. तर शेत-शिवार आणि घरं पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे.

येलो अलर्ट म्हणजे हा सावध राहा असा संदेश देणारा अलर्ट आहे. हवामानात काही दिवस मोठ्या घडामोडी होतील. हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते. पावसाने किंवा वीजा चमकण्याने तुमचे दैनंदिन जीवन विचलित होऊ शकते. 7.5 ते 15 मिमी पाऊस होऊ शकतो, असा याचा अर्थ होतो.

Published on: Jul 11, 2024 1:14 PM
Follow Us