Share Market : शस्त्रबंदी होताच शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 2200 अंकांनी वधारला
शेअर बाजारात आज चांगलीच तेजी बघायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम शेअर बाजारावर देखील बघायला मिळाला आहे.
भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रबंदी नंतर आता शेअर बाजारात चांगलीच तेजी आली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 2200 अंकांनी वधारला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला होता. त्यामुळे सेन्सेक्समध्ये चांगलीच घसरण झाली होती. मात्र आता दोन्ही देशांनी शस्त्रबंदीचा नियम पाळण्याच्या मतावर एकमत करताच पुन्हा एकदा शेअर बाजारात अच्छे दिन आलेले बघायला मिळाले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजार उघडताच 2200 अंकांनी सेन्सेक्स वाढलेला बघायला मिळाला आहे.
Published on: May 12, 2025 02:08 PM
Latest Videos