Mock Drill : महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
Mock Drill In Maharashtra : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात मॉक ड्रिल होणार आहे. यात महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे.
राज्यात उद्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. मुंबईत उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. महाराष्ट्रातील 3 शहरं ही सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील आहेत. मुंबई कॅटेगिरी एकमध्ये तर ठाणे, पुणे आणि नाशिक हे कॅटेगिरी दोनमध्ये आहेत.
भारत – पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात उद्या 295 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यात महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. यात कॅटेगिरी एकमध्ये मुंबई, उरण आणि तारापुरचा समावेश आहे. कॅटेगिरी दोनमध्ये ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सिन्नर, मनमाडचा समावेश आहे. संभाजीनगरचा समावेश कॅटेगिरी तीनमध्ये केला आहे. भुसावळचा देखील यात समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यालगतचा भाग देखील कॅटेगिरी तीनमध्ये आहे.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?

