Thane Mock Drill : मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
Mock Drill In Mumbai : देशासह राज्यात सगळीकडे हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. तसे आदेश गृह खात्याकडून देण्यात आलेले आहेत.
उद्या ठाण्यात देखील मॉक ड्रिल होणार आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात हे मॉक ड्रिल घेतलं जाण्याची शक्यता आहे. या मॉक ड्रिलसाठी ठाणे रेल्वे प्रशासन सज्ज झालं आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे कधीही युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासाठी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश गृह खात्याकडून सगळ्या राज्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उद्या देशासह राज्यात सगळीकडे हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. तसंच सायरन देखील वाजवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून देखील तयारी करण्यात आलेली आहे.
Published on: May 06, 2025 06:51 PM
Latest Videos
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी

