India Vs Pakistan War S-400 : भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, वापरली ही पॉवरफूल्ल सिस्टीम; पाकड्यांचा डाव उधळला
पाकिस्तानच्या अयशस्वी हल्ल्याच्या प्रयत्नाला खवळलेल्या भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान HQ 9 ही डिफेन्स यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली. दुसरीकडे पाकच्या १२ शहरांवर ड्रोनने हल्ले झाले. पाकिस्तान पुन्हा कांगावा करत स्वतःच स्वतःच्या शहरांवर हल्ले घडवून आणले असंही आता बोललं जातंय.
भारताने इतिहासात पहिल्यांदा एस-४०० या एअर सिस्टीमचा वापर करून पाकिस्तानचे दात घशात घातले. दहशतवादी अड्ड्यांना नेस्तनाभूत केल्यानंतर झळफळाट झालेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. मात्र पाकच्या सगळ्याच मनसुब्यांची भारतीय सैन्यानी राख रांगोळी केली. यामध्ये सर्वात हुकमी हत्यार ठरलं ते म्हणजे एस-४०० ही डिफेन्स सिस्टीम… काल रात्री पाकिस्ताने सीमे लगतच्या भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानने त्याच्या हद्दीतून भारतावर काही मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा प्लान केला होता. एकूण १५ शहरं टार्गेटवर होती. मात्र आधीच अलर्ट असलेल्या भारताने सीमेवर एस-४०० ही डिफेन्स सिस्टीम तैनात केली होती. ६०० किमी लांबूनच मिसाईलचा वेध घेणारी यंत्रणा अलर्ट झाली. एस- ४०० मैदानात आल्यानंतर पुढच्या काही क्षणात पाकचे सगळेच हल्ले हवेत नष्ट झाले. भारताच्या हवाई सैन्याने एकएक करून पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हानून पाडले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

