iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत

iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत

| Updated on: Sep 18, 2026 | 12:28 PM

मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथील ॲपल स्टोअरमध्ये नवीन आयफोन सिरीजच्या लॉन्चिंगसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. 9 सप्टेंबरला घोषणा झाल्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून आयफोन 18 प्रो मॅक्स, ॲपल वॉच आणि हेडफोन्स विक्रीसाठी उपलब्ध झाले. ग्राहक पहाटेपासून रांगेत उभे होते आणि नव्या फीचर्सबद्दल उत्सुकता व्यक्त करत होते.

ॲपलच्या नवीन आयफोन सिरीजचे आजपासून बाजारात आगमन झाले आहे. मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह परिसरातील ॲपल स्टोअरमध्ये यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 9 सप्टेंबर रोजी या नवीन सिरीजची घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच प्री-बुकिंगला सुरुवात झाली होती.

आज सकाळी 8 वाजल्यापासून नवीन आयफोन, ॲपल वॉच आणि हेडफोन्स विक्रीसाठी उपलब्ध झाले. ज्या ग्राहकांनी प्री-बुकिंग केले होते, त्यांनी पहाटेपासूनच ॲपल स्टोअरबाहेर रांगा लावल्या होत्या. पनवेलहून आलेल्या एका ग्राहकाने सांगितले की, तो सकाळी 4 वाजल्यापासून नवीन आयफोन 18 प्रो मॅक्स घेण्यासाठी रांगेत उभा होता. या फोनचा रंग, आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट कॅमेरा व प्रोसेसर हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे. पूर्वी आयफोन 17 वापरणाऱ्या या ग्राहकाने थेट आयफोन 18 प्रो मॅक्सवर अपग्रेड केले आहे. नव्या फोनच्या विक्रीला सुरुवात होताच ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

Published on: Sep 18, 2026 12:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us