War | आता गॅसची वणवण थांबणार… आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
भारताच्या दिशेने आणखी एक तेल जहाज रवाना झाले आहे. जग लाडकी या नावाचे जहाज सुमारे 80,000 टॅन क्रूड ऑइलसह भारताकडे निघाले आहे. या जहाजावर तेल भरत असताना युएईतील फुझेरा तेल टर्मिनलवर हल्ला झाला, मात्र या हल्ल्यात जहाजाला होणारा मोठा धोका टळला आणि ते सुरक्षितरीत्या बाहेर पडले आहे.
भारताच्या दिशेने आणखी एक तेल जहाज रवाना झाले आहे. जग लाडकी या नावाचे जहाज सुमारे 80,000 टॅन क्रूड ऑइलसह भारताकडे निघाले आहे. या जहाजावर तेल भरत असताना युएईतील फुझेरा तेल टर्मिनलवर हल्ला झाला, मात्र या हल्ल्यात जहाजाला होणारा मोठा धोका टळला आणि ते सुरक्षितरीत्या बाहेर पडले आहे. भारतीय ध्वज असलेले जग लाडकी जहाज आता भारताच्या दिशेने सुरक्षित मार्गावर आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संकटांमुळे ऊर्जा पुरवठा आणि तेल वाहतुकीवर संभाव्य परिणाम टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे, असं केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, युएईमधील हल्ला आणि सागरी संकट असले तरीही जहाज सुरक्षित असून भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. तसेच, देशातील ऊर्जा सुरक्षेसाठी तसेच सागरी वाहतुकीसाठी योग्य मार्गदर्शन आणि नियंत्रण ठेवले जात आहे.
