Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम

Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम

| Updated on: Jun 11, 2026 | 1:27 PM

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार घेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर जळगावातही रेश्मा काळे माघार घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, रेश्मा काळे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रेश्मा काळे म्हणाल्या की, “गेल्या काही दिवसांपासून माझ्या माघारीबाबत आणि पाठिंब्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, नाशिकमधील राजकीय घडामोडी पूर्ण होऊ द्या. त्यानंतरच आम्ही पुढील भूमिका ठरवू.”

त्या पुढे म्हणाल्या की, “गोकुळ गीते यांनी नाशिकमध्ये अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिला असला, तरी मी कोणताही निर्णय घाईत घेणार नाही. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय जाहीर केला जाईल. तोपर्यंत माझी उमेदवारी कायम राहणार आहे.”

रेश्मा काळे यांच्या या भूमिकेमुळे जळगावातील विधान परिषद निवडणुकीचे राजकीय समीकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. महायुतीमध्ये अंतर्गत बंडखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पक्षश्रेष्ठी या प्रश्नावर काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रेश्मा काळे यांच्या निर्णयामुळे जळगावातील निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 11, 2026 1:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us