‘मैने एक रावण को ढाई साल पहले जलाया था…….’

जालन्यात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

'मैने एक रावण को ढाई साल पहले जलाया था.......'
कैलास गोरंट्याल, काँग्रेस आमदार, जालना Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 3:59 PM

जालनाः अडीच वर्षांपूर्वी मी एका रावणाचं दहन(Rawan Dahan) केलं होतं. आता आगामी अडीच वर्षांनीही त्या रावणाला जाळणार आहे, असं वक्तव्य जालन्याचे आमदार कैलास गोरंट्यान यांनी केलंय. काँग्रेसचे कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी ही जळजळीत टीका केलीय शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर. नाव घेतलं नाही, पण अडीच वर्षांपूर्वी गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकीत खोतकरांचा पराभव केला होता. त्यामुळे हाच धागा पकडत त्यांनी खोतकरांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आता खोतकर त्यांना काय उत्तर देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

जालन्यात काल विजया दशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित होते. रावण दहनाच्या पूर्वी त्यांनी कट्टर शत्रू अर्जून खोतकर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘ मैने एक रावण को ढाई साल पहले मेंने जलाया था, और ढाई साल बाद भी जलाऊंगा…

औरंगाबाद आणि जालन्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या कार्यक्रमांमध्ये भाजप, शिवसेने आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी झाली. एका कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी कैलास गोरंट्याल यांनाच आव्हान दिलं. त्यानंतर गोरंट्याल यांनीही सत्तार यांच्यावरही टीका केली. सत्तारांचा काही भरोसा नाही. ते एक दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही धोका देतील असे म्हणाले.

त्यानंतर विजया दशमीच्या कार्यक्रमात त्यांनी जालन्यातील अर्जुन खोतकर यांचं नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधला. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल विरोधात अर्जुन खोतकर असा सामना रंगला होता.

मात्र  25 हजारांच्या मताधिक्याने गोरंट्याल यांनी खोतकरांवर विजय मिळवला होता. जालना विधानसभेचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि शिवसेनेत तगडी फाइट पहायला मिळते.

मात्र यंदा शिवसेनेत उभी फूट पडल्याने सर्वच राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यातच शिवसैनिक असलेले अर्जुन खोतकर मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे गटात शामील झालेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचा जालन्याचा सामना पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.