Jammu Kashmir News : जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
India Pakistan Conflict : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीदरम्यान, सीमेलगतच्या गावांना टार्गेट करण्यात आलं होतं. या गावांना पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे.
जम्मू बॉर्डरच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान, पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळे डागण्यात आलेले होते. या हल्ल्यांमध्ये नागरी वस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र जम्मू बॉर्डरच्या एका गावात राहणारे कुटुंबीय फक्त दैव बलवत्तर म्हणूनच हल्ल्यातून वाचले असल्याचं समोर आलं आहे.
जम्मूच्या बॉर्डरपासून 200 मीटरच्या अंतरावर असलेल्या एका गावावर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. बऱ्याच लोकांनी या काळात गाव सोडलं होतं. ते आता परत येत आहेत. त्यातच आता एका घरात जीवंत बॉम्ब आढळून आला आहे. हा बॉम्ब फुटला नसल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून या घरातल्या लोकांचा जीव वाचला असल्याचंच यातून दिसून आलं आहे.