Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान भीषण अपघात घडला असून, भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक वारकरी जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. पालखी जेजुरीत दाखल होत असताना पारंपरिक भंडाऱ्याच्या उत्साहात वारी सुरू असताना अचानक एक टेम्पो अनियंत्रित झाला आणि थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला.
या भीषण धडकेत दिंडीतील अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. त्यापैकी तीन महिला वारकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेमुळे सासवड-जेजुरी मार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.
दरम्यान, टेम्पो अचानक अनियंत्रित होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आषाढी वारीच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.