jitendra Awhad : ‘ऐ मल्हार मटन आण.. असं म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का?’ जितेंद्र आव्हाडांचा खोचक प्रश्न
मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र आता त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील आज नितेश राणे यांच्यावर टीका केली.
मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पाठिंबा दर्शवला. मात्र यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हिंदूमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं विरोधकांनी म्हटलं असून आता जितेंद्र आव्हाड यांनीही हिंदूना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलताना आव्हाड म्हणाले की, हा वाद होऊच शकत नाही, जे मटन आपण खातो ते कसं कापल जातं हे जो मटणाच्या दुकानात गेला आहे त्यालाच माहिती आहे. उगच कारण नसताना याला धर्माचा स्पर्श दिला जात आहे. आपली धर्म पुस्तकं जयणी लिहिली ते मटन निषिद्ध मनात होते. म्हणून मटणाचा कोणताही उल्लेख आपल्या धर्मपुस्तकात नाही. तरीही आपल्या देशातले 80% लोकं हे मांसाहारी आहेत. हलाल हा शब्द अरेबिक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या योग्य आणि कायदेशीर असा त्याचा अर्थ आहे. यात कुठेही धर्माचा विषय येत नाही, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. मल्हार हे नाव महाराष्ट्राच्या आराध्य देवतेशी जोडलेलं आहे. तेच नाव तुम्ही मटणाला दिलं. म्हणजे तुम्ही एकेरी उल्लेख करून देवाचा अपमान करणार का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच कुर्ता शेरवानी हा एक विशिष्ट धर्माचा पोशाख आहे, तो पण घालायचा बंद करा असा फतवा तुम्ही काढणार का? असंही सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात

देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
