आव्हाडांनी तुतारी वाजवली पण… अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?
राष्ट्रवादीला आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाप्रमाणे नवे निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी हे चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. या चिन्हाचा अनावरण सोहळा रायगडावर थाटामाटात करण्यात आला. या तुतारी चिन्हावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जुंपली आहे.
मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी या नव्या चिन्हाचं रायगड येथे जाऊन शिवरायांच्या साक्षीने या नवीन चिन्हाचं अनावरण केलं. आता या चिन्हावरुन अजित पवार गटाचं नेते अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना तुतारी वाजवून दाखवावी ती पुढूनच वाजवा अशी टीका केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आज रायगडावर तुतारी फुंकली. परंतू याचा व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी शेअर केला आणि तुतारी फुंकताना जितेंद्र आव्हाड यांचे पोट पुढे आलेले दिसत आहे. म्हणजे त्यांनी तुतारी वाजविली नसून पाटची सराईत मंडळी ती वाजवित आहेत अशी टीका मिटकरी यांनी केली. आपल्याला अजित पवार यांचा पगारी कार्यकर्ता अशी टीका आव्हाड करतात ना मला 50 हजार पगार मिळतो म्हणतात. मग त्यांना खरी तुतारी वाजवून दाखवावी आणि माझे दोन पगाराचे एक लाखाचा धनादेश त्यांनी माझ्याकडून घेऊन जावा असे चॅलेज मिटकरी यांनी केले आहे. त्यांनी लिहीलेला धनादेश देखील दाखविला आहे.
Published on: Feb 24, 2024 09:11 PM
शिंदे गटाकडे फक्त पैसा, विचार नाही!; ऑपरेशन टायगरवरून दानवेंचा घणाघात
मी जबाबदारी घेतो म्हणत चक्क... ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेणारा बडा
गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत राऊतांचा इशारा
त्या प्रकरणासाठी ओमराजे निंबाळकरांवर दबाव, संजय राऊतांनी सांगूनच टाकलं

