Konkan Rain | कोकण किनारपट्टीवर काळे ढग, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण
कोकण किनारपट्टीवर काळे ढग, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण

Konkan Rain | कोकण किनारपट्टीवर काळे ढग, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण

| Updated on: Jun 02, 2021 | 12:08 PM

केरळमध्ये मान्सुन दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सुन दाखल होण्याची अनेक जण वाट पहायतायत. सध्या अरबी समुद्रात मान्सुन सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळतायत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पहायला मिळतेय. तर मतलई वारे सुद्दा सध्या वेगाने वाहतायत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत.