Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर

Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर

| Updated on: Jul 05, 2026 | 2:41 PM

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील 6 दिवसांत शहरातील अनेक भागांत झाड पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये झाड कोसळून 10 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुर्ल्यातही अशाच प्रकारची घटना घडल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुर्ल्यातील नौपाडा परिसरात रविवारी दुपारी सुमारे 12.40 वाजता झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत 63 वर्षीय युनूस कुंडावाला गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. धोकादायक झाडांची वेळेत छाटणी आणि तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सततच्या पावसामुळे अनेक जुनी झाडे कमकुवत झाली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Published on: Jul 05, 2026 2:41 PM
Follow Us