तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं… लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर

तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं… लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर

| Updated on: Jun 28, 2026 | 5:25 PM

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात मानला जात होता. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात मानला जात होता. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. केतनची होणारी पत्नी सिया हिने प्रियकर चेतनच्या मदतीने कट रचल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांची तब्बल 12 तास चौकशी केली. तसेच तिचा भाऊ साहिल याचीदेखील जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ताज्या माहितीनुसार, पोलिसांनी सिया आणि चेतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन संपूर्ण घटनेचे रिक्रियेशन केले. सियाला त्याच जागी न्हेलं. पुतळा हातात दिला, डमी पुतळ्याच्या मदतीने नेमके कशाप्रकारे ढकलण्यात आले याची पाहणी करण्यात आली. अपघात वाटावा यासाठी योग्य जागेची निवड केल्याचाही तपासात खुलासा झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकरणाची सिया चेतनने रंगीत तालिम देखील केली होती. सध्या पोलिसांकडून दोघांची समोरासमोर चौकशी सुरू आहे.

Published on: Jun 28, 2026 5:25 PM
Follow Us