VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 4 May 2022
औरंगाबाद शहरातील अनेक मशिदींमध्ये आज कमी आवाजात अजान देण्यात आली. शहरातील बहुतांश मशिदींमध्ये हेच चित्र दिसले. तर काही मशिदींमध्ये भोंग्यांशिवाय अजान पार पडली. मुस्लिम भाविकांनी कमी आवाजात अजान लावल्यामुळे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे आभार मानले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 04 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता.
औरंगाबाद शहरातील अनेक मशिदींमध्ये आज कमी आवाजात अजान देण्यात आली. शहरातील बहुतांश मशिदींमध्ये हेच चित्र दिसले. तर काही मशिदींमध्ये भोंग्यांशिवाय अजान पार पडली. मुस्लिम भाविकांनी कमी आवाजात अजान लावल्यामुळे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे आभार मानले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 04 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवरच मनसेने हा इशारा दिला असून तो न पाळल्यास तीव्र प्रतिक्रिया देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र राज्यातील इतर भागांप्रमामेच औरंगाबादमध्येही विविध मशिदींवरील आजची अजान अत्यंत कमी आवाजात देण्यात आली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही मुस्लिम भाविकांचे आभार मानले.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...

