Devendra Fadnavis | अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी हायपरफॉर्मन्स सेंटर्सची घोषणा
महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडताना शेतकरी, महिला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रांसाठी विविध महत्त्वपूर्ण तरतुदी जाहीर केल्या. यावेळी राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती दिली.
महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडताना शेतकरी, महिला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रांसाठी विविध महत्त्वपूर्ण तरतुदी जाहीर केल्या. यावेळी राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती दिली. राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस अशा एकूण 12 खेळांसाठी राज्य स्तरावर 8 हायपरफॉर्मन्स सेंटर्स सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच विभागीय स्तरावर आणखी 4 हायपरफॉर्मन्स सेंटर्स सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. याशिवाय राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी विभागीय स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील खेळाडूंना अधिक चांगल्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होऊन महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
