Ajit Pawar Funeral Update | परत या, परत या, अजितदादा परत या…च्या घोषणा; अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला आहे. दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवलं आहे. दादांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी जनसागर ओसंडून वाहू लागल्याने तुडुंब गर्दी रस्त्यावर दिसून येते. 'एकाच वादा, अजित दादा' परत या परत या, अजितदादा परत या... अशा घोषणा देत कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला आहे. दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवलं आहे. दादांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी जनसागर ओसंडून वाहू लागल्याने तुडुंब गर्दी रस्त्यावर दिसून येते. ‘एकाच वादा, अजित दादा’ परत या परत या, अजितदादा परत या… अशा घोषणा देत कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर पवार कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी जमले आहेत. थोड्याच वे.वेळात पवार यांचे अंत्यसंस्कार विधीवत पार पडणार आहेत.
