Dilip Walse Patil Corona Positive | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

Dilip Walse Patil Corona Positive | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 28, 2021 | 11:19 AM

देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये.

मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.“कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”, असं ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us