जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष

जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष

| Updated on: Sep 17, 2026 | 7:05 PM

मालेगावच्या सावता मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. अयोध्येला जाऊन दर्शन घेणं शक्य नसलेल्या भाविकांना मालेगावातच अयोध्येची अनुभूती मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. ४३ वर्षांची परंपरा जपत, मंडळ सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करत आहे.

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी सर्वांना पोहोचणे शक्य होत नसल्याने, मालेगावच्या सावता मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची एक भव्य प्रतिकृती साकारली आहे. प्रत्येक हिंदू भाविकाच्या मनात प्रभू श्रीराम आणि अयोध्या मंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याने, मालेगावकरांना अयोध्येची अनुभूती आपल्या शहरातच मिळावी, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. १९८३ साली स्थापन झालेल्या या मंडळाला ४३ वर्षांची अखंड परंपरा आहे. या परंपरेचे जतन करत असतानाच, मंडळाने सामाजिक कार्याचीही नेहमीच कास धरली आहे. या प्रतिकृती उभारणीसाठी मालेगावातील बोराटे डेकोरेटर्स यांनी सहकार्य केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नंदुरबार येथून २२ फुटांची महागणपतीची मूर्ती आणण्यात आली असून, स्थानिक कलाकार चेतनजी साखला यांनी तिचे सुंदर रंगकाम केले आहे. शहरातील गणेशभक्तांनी मंडळाच्या गणरायाला “मालेगावचा महागणपती” असा मान दिला असून, त्यांच्या प्रेमामुळे मंडळाला नवनवीन उपक्रम राबवण्याची ऊर्जा मिळते, असे मंडळाचे कार्यकर्ते सांगतात.

Published on: Sep 17, 2026 7:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us