Ulhas Bapat On Mamta Banerjee | ममता बॅनर्जींनी राजीनामा न दिल्यास काय होणार? कायदेतज्ज्ञ काय सांगतात?

| Updated on: May 06, 2026 | 3:39 PM

तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी कायदेतज्ञ काय सांगतात पहा...

तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी कायदेतज्ञ काय सांगतात पहा…

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते आजही जल्लोष करताना दिसत आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. मात्र आता ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याने भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. यावर कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं की, ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. कायद्यानुसार पाहायला गेलं, तर सत्ताधारी पक्ष आणि ममता बॅनर्जी कोणीही नियमांनुसार वागत नाहीये.

पुढे कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणाले, ‘उद्या ममताजींचा कार्यकाळ संपणार आहे, म्हणजे सात तारखेला त्या आपोआप पदावरून डिसोल्व्ह होतील. त्यामुळे ते पद सात तारखेनंतर मोकळे समजावे.’ ‘ममताजी या प्रकरणी कोर्टातही जाऊ शकातात…’

Published on: May 06, 2026 03:31 PM
Follow Us