दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

| Updated on: May 01, 2026 | 12:58 PM

सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळपासूनच वाहतूक मंद गतीने सुरू होती, मात्र दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर होत दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली.

या वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला आहे. त्या गेल्या दोन तासांपासून या कोंडीत अडकून असल्याची माहिती समोर आली आहे. विकेंड आणि सलग तीन सुट्ट्यांमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात लोणावळ्याकडे रवाना झाल्याने हा ट्रॅफिक जाम झाल्याचे सांगितले जात आहे. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, ती कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पुणे लेनवर तात्पुरते 15 मिनिटांचे ब्लॉक लावले आहेत. मात्र, त्यानंतरही वाहतूक सुरळीत होण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्या स्वतः वाहतूक कोंडीत अडकल्या असल्याचे सांगताना दिसत आहेत. तसेच, शेजारील वाहनचालकांशी संवाद साधत “दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलो आहोत,” असे त्या म्हणताना दिसतात. काही वाहनचालकांनीही सकाळी सात वाजता निघूनही अजून मार्ग मोकळा न झाल्याची व्यथा व्यक्त केली. एकूणच, सलग सुट्ट्यांमुळे वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला असून, प्रशासनासमोर वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Published on: May 01, 2026 12:58 PM
Follow Us