‘औरंगजेब काही आमचा नव्हता, त्यामुळं त्याचं अनुकरण का?’ एकनाथ खडसे ओवैसीवर भडकले

‘औरंगजेब काही आमचा नव्हता, त्यामुळं त्याचं अनुकरण का?’ एकनाथ खडसे ओवैसीवर भडकले

aslam shanedivan | Updated on: Jun 25, 2023 | 5:47 PM

त्यावरून आता राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरून आता ओवैसी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.

जळगाव : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या बुलढाण्यातील सभेत औरंगजेबच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावरून आता राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरून आता ओवैसी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी औरंगजेबाचा इतिहास जर आपण पाहिला तर तो फार चांगला असल्याचे किंवा त्यातून चांगला संदेश देता येईल अस नसल्याचे म्हटलं आहे. तर बुलढाणा येथे झालेल्या त्या घोषणांवर त्यांनी नाराजी व्यक्त करताना, औरंगजेबाची व्यक्तिगत वर्तणूक चांगली होती, मात्र शासक म्हणून तो योग्य नव्हता असं म्हटलं आहे. तर शासनकर्ता म्हणून इस्लाम धर्माचा प्रचार करताना त्याने दुसऱ्या धर्माचा दु:साहस केला. हिंदू धर्माची मंदिरं तोडली. तर महत्वाचं म्हणजे औरंगजेब काही आमचा नव्हता. तो या मातीतला जन्मलेला नव्हता. बाहेरून येऊन आमच्यावर अत्याचार करणाऱ्या, आमची मंदिरं तोडणाऱ्या औरंगजेबचं अनुकरण का? असा सवाल करताना, जे झालं आहे ते महाराष्ट्राला सहन न होणारं आहे, असंही खडसे म्हणाले.

Published on: Jun 25, 2023 5:47 PM
Follow Us