एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या…. नेमकं काय घडलं?

एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या…. नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 11, 2026 | 2:03 PM

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी मशिदीत उमेर शेख नावाच्या इसमाने भयंकर कृत्य केलं. या घटनेमुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी मशिदीत उमेर शेख नावाच्या इसमाने भयंकर कृत्य केलं. या घटनेमुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एका मशिदीत नेऊन 7 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी उमेर शेख याच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी उमेर शेख याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जिन्सी पोलीस ठाण्याकडून सुरू असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Published on: Jun 11, 2026 2:03 PM
Follow Us