Mira Bhayandar | चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या रुग्णालयातील प्रकाराने एकच खळबळ

Mira Bhayandar | चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या रुग्णालयातील प्रकाराने एकच खळबळ

| Updated on: Mar 16, 2026 | 2:10 PM

मीरा भायंदरच्या शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माठेकर व्हेंटिलेटरवर असताना उंदराने त्यांचा हात कुरतडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही माहिती रुग्णाच्या भेटीसाठी आलेल्या नातेवाईकांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील सावधगिरीचा प्रश्न उभा राहिला आहे.

मीरा भायंदरच्या शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माठेकर व्हेंटिलेटरवर असताना उंदराने त्यांचा हात कुरतडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही माहिती रुग्णाच्या भेटीसाठी आलेल्या नातेवाईकांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील सावधगिरीचा प्रश्न उभा राहिला आहे. सुहासिनी माठेकर यांच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, या प्रकारानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने रुग्णालयाच्या डीनसमोर ठिय्या आंदोलन केले. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीतील कमतरतेमुळे रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच आंदोलकांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरले. त्यामुळे रुग्णालयात थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांनी या गंभीर बाबीची योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 16, 2026 02:10 PM
Follow Us