राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं… भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नगरसेविका अनिता पाटील यांच्या दोन सख्ख्या भावांकडून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नगरसेविका अनिता पाटील यांच्या दोन सख्ख्या भावांकडून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलगी केवळ 5 वर्षांची होती तेव्हा पासून हा प्रकार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. एका भावाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या भावाकडूनही मुलीवर अत्याचार सुरूच राहिल्याचा आरोप आहे. व्हिडिओ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून मुलीला धमकावण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे. अखेर मुलीने पोलिसांमध्ये तक्रार केली अन् प्रकरण उघडकीस आलं.
या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आधी त्यांनीच या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. TV9 मराठीशी बोलताना त्यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले. तसेच संबंधित मुलीच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंतचा सर्व खर्च आपण उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले. देशात नेरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात तसेच महाराष्ट्रात फडणवीसांच्या नेतृत्त्वात विविध विकासकामे सुरू असताना पक्षातील काही लोकांचे असे कृत्य पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत.
