Raju Patil : ‘दारात आलेल्या कुत्र्याला..’, भिडेंच्या आडून राजू पाटलांचा निशाणा कोणावर?
MNS Raju Patil Tweet : संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच आता मनसेचे राजू पाटील यांनी देखील याबद्दल एक ट्विट शेअर केलं आहे.
दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो. बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील, असं ट्विट मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या ट्विटनंतर आता सोशल मिडियावर तर्कवितर्क लावले जात आहेत. संभाजी भिडे यांच्या आडून राजू पाटलांचा दुसऱ्याच कोणावर निशाणा आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
संभाजी भिडे गुरुजी यांना परवा सांगलीत एका कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर या घटनेवर जोरदार टीका विरोधक करत आहेत. सोशल मिडियावर देखील या घटनेवरून जोरदार टिकबाजी केली जात आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी देखील यावर ट्विट शेअर करत टीका केलेली बघायला मिळाली आहे. ‘दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो. बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील!’ असं आपल्या ट्विटमध्ये राजू पाटलांनी म्हंटलं आहे. पण भिडे गुरुजींच्या आडून हा टोला राजू पाटलांनी आणखी कोणाला लगावला आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

